आदर्श जीवनासाठी शिक्षणहाच पर्याय -घनश्याम सोनवणे
राष्ट्रसंत भगवान बाबांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

आदर्श जीवनासाठी शिक्षणहाच पर्याय -घनश्याम सोनवणे
राष्ट्रसंत भगवान बाबांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
वडुज प्रतिनिधी–
स्पर्धेच्या युगात आदर्श जीवन जगण्यासाठी शिक्षण हाच पर्याय असे प्रतिपादन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मांडवे तालुका खटाव येथे केले तेपुढे म्हणाले की भगवान बाबांचे संस्कार माझ्यावर असल्यामुळे मी जातिभेद न मानता सर्वांना समान वागणूक देतो व हिच शिकवण मी तळागाळातील माणसापर्यंत पोहचवून प्रबोधन घडवने हेच मी माझे कर्तव्य समजतो त्याच प्रमाणे शिक्षणा शिवाय समाजाला आज पर्याय नाही हे राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी सांगितले आहे हेच बाबांचे आदर्श मूल्य मी माझ्या जीवन जगत आहे तरुणांनी आपल्या समाजातील रूढी परंपरा जोपासाव्यात तसेच अनिष्ट रूढी, परंपरा यांना तिलांजली द्यावी व बाबांची आदर्श मूल्ये आपल्या आंगी रुजवावी
राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित् सकाळ पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात ह भ प दशरथ जाधव महाराज यांचे कीर्तन व जय भगवान सेवा रत्न पुरस्कारने चाकण येथील कोयाली फॉरेस्ट या संस्थेचे संचालक अशोकराव देशमाने व त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचे हस्ते पुरस्कृत करण्यात आले यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय शिरसागर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज प्रकाशशेठ कट्टे इत्यादीमान्यवर उपस्थित होते
खटाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल व डिजिटल मीडियाच्या खटाव तालुका अध्यक्षपदी श्री डॉक्टर विनोद खाडे ,तर सचिव पदी जनकल्याण न्यूज चे संपादक श्री. जे.के.काळे, खजिनदार डी.एस.पी न्यूज लाईव्ह चे संपादक दत्तात्रय फाळके तर प्रसिद्धीप्रमुख लालासाहेब माने- पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
या समारंभ प्रसंगी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर तसेच मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज व अशोकराव देशमाने यांनी मनोगते केली यावेळी मांडवे गावातील ग्रामस्थ तसेच जय भगवान बाबा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.