औंध मध्ये 400 वर्षांपूर्वीच्या श्री यमाई तळे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

औंध मध्ये 400 वर्षांपूर्वीच्या श्री यमाई तळे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन
औंध -प्रतिनिधी महेश यादव
श्री यमाई तळे हे अध्यावत उद्यान असणार- श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांची माहिती औंध मध्ये 400 वर्षांपूर्वीचे श्री यमाई तळे हे पदमाळे व नागाळे या नावाने ओळखले जाते. याच तळ्याच्या सुशोभीकरण व विकास कामाचे भूमिपूजन आज औंध मध्ये आधारस्तंभ असलेल्या श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी औंधचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. यावेळी श्री हनुमंतराव शिंदे ,राजेंद्र माने, सरपंच सोनाली मिठारे, उपसरपंच दीपक नलवडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल माने, तानाजी इंगळे, शितल देशमुख ,शुभांगी हरिदास, संतोष भोसले उद्धव माने ,गणेश देशमुख ,गणेश हरिदास, वसंत जानकर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटक विकास योजनेचे हे काम करण्यात येणार आहे हे एकूण 39.58 कोटी रुपयांचे निधी उपलब्ध करण्यात आला आहे अशी माहिती श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हनुमंतराव शिंदे व दीपक नलावडे यांनी आभार मानले.