पुसेसावळीतील घटनेत दोषीवर कठोर कारवाई करणार — पालकमंत्री शंभूराज देसाई

- पुसेसावळीतील घटनेत दोषीवर कठोर कारवाई करणार — पालकमंत्री शंभूराज देसाई
प्रतिनिधी :- समद आत्तार
पुसेसावळी येथील शिकलगार कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर माझ्याशी बोला, असा विश्वास पालकमंत्र्यांनी दिलाया प्रकरणातील सत्य नक्की बाहेर काढू. इथून पुढे प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. तुम्ही खचून जाऊ नका.तपासी अधिकाऱ्यांबरोबर साताऱ्यातील वरिष्ठ अधिकारी त्या तपासावर लक्ष ठेवून आहेत. कोणीही भीती खाली वावरू नये. कोणाबद्दल संशय असेल किंवा तक्रार असेल तर प्रशासनातील अधिकाऱ्यांना या गोष्टी लक्षात आणून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.पोलीस अधिकारी वेळेत पोहोचले त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे. ज्यांनी या गावात अशांतता पसरवली, ज्यांनी मुद्दाम या गोष्टी घडवून आणल्या, त्यांना शोधून काढू. गावात सलोखा ठेवा. भीतीपोटी जर का कोणी गावाबाहेर गेले असेल त्यांनी गावांमध्ये यावे. निरपराध असलेल्या कोणावरही कारवाई होणार नाही. मुद्दाम या प्रकरणात अडकवले जाणार नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.