गुरुवार १६ रोजी मायणीत जरांगे पाटलांची सभा होणार
१६ नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजता होणार सभा

गुरुवार १६ रोजी मायणीत जरांगे पाटलांची सभा होणार
१६ नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजता होणार सभा
मायणी – प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सलग १४ वर्षे झुंजणारे कणखर नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांची मायणी ता खटाव येथे गुरुवारी दि. १६ रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे
या सभेसाठी सकल मराठा बांधव कंबर कसून कामाला लागले असून दिवाळी सणा पेक्षा या कामाने भारावून समाज गेलेला दिसतो प्रत्येकाला या सभेची उत्सुकता लागली असून,यासाठी अबाल वृद्ध तयारीला लागला असल्याची माहिती मायणी मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली
गुरुवारी दि. १६ रोजीची जरांगे पाटलांची पहिली सभा दहा वाजता दीड येथे असून, तेथून सुमारे २२० किलोमीटर अंतरावर मायणीची सभा होणार आहे या काळात मध्ये कोठेही सभा होणार नसल्याने या सभेला मोठी गर्दी होणार असल्याने त्या प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. मायणीतील समाज बांधवांना शब्द दिल्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क दौऱ्याला मायणीपासूनच सुरुवात करणार हा शब्द पाळत त्यांच्यासाठी मुबलक वेळ मिळावा यासाठी त्यांचा मुक्कामच मायणीत होणार आहे
. या सभाचे आयोजन चितळी रस्त्यावरील अकॅडमीच्या मैदानावर करण्यात आले आहे. सदर सभेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर जिल्हयांतून सुमारे दोन लाख मराठा बांधव येणार आहेत ५० एकर जमिनीवर लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुमारे ७० एकर परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे. जनरेटर व्यवस्था मोठ्या स्क्रीनची सोय १२ ह्यालॉजनचा एक टॉव्हर या प्रमाणे १० टॉव्हर उभारण्यात येणार आहेत मोठी ह्यांगिंग साउंड सिस्टमची सोय करण्यात येणार आहे तसेच मायणी
ग्रामपंचायतीचे मार्फत पाणी व्यवस्था करण्यात येणार आहे आरोग्य विभागामार्फत आरोग्य खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार असून, रुग्णवाहिका व अग्निशमन दलास यांची मदत घेण्यात येणार आहे.