माजी आमदार प्रभाकर घार्गेच्या वाढदिनी उद्या शेतकरी मेळावा, अभीष्टचिंतन सोहळा

माजी आमदार प्रभाकर घार्गेच्या वाढदिनी उद्या शेतकरी मेळावा, अभीष्टचिंतन सोहळा
मायणी …… प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वडूज येथील विभागीय कार्यालयाच्या आणि खटाव-माण तालुका अॅग्रो प्रोसेसिंग कारखान्याच्या वतीने पळशी, ता. खटाव येथे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिनी अभीष्टचिंतन सोहळा आणि शेतकरी मेळावा गुरुवार, -सातारा दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार प्रभाकर घार्गे भूषविार असून, मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्षअनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आदि मान्यवर उपस्थिती राहणार आहेत
या मेळाव्यात शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो, याचे मार्गदर्शन तज्ज्ञ करणार आहेत. विशेषतः पाणी व खत व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण, उत्पादन अंदाज ब बाजारभावाचे भाकीत करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचे फायदे स्पष्ट करण्यात येणार आहेत.
याशिवाय शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, हवामान बदलाचे परिणाम, शासकीय योजना ब अनुदानांचा लाभ तसेच आधुनिक कृषी यंत्रसामग्रीच्या वापराबाबतही महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. पळशी, ता. खटाव येथील या भव्य सोहळ्यास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले