मायणीत पिसाळलेल्या श्वानाने घेतला पाच जणांना चावा.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

मायणीत पिसाळलेल्या श्वानाने घेतला पाच जणांना चावा.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
मायणी …. प्रतिनिधी
मायणी ता . खटाव येथे एका पिसाळलेल्या श्वानाने एकूण पाच जणांना चावा घेतला असून दुसऱ्या चार जणांना अन्य न पिसाळलेल्या श्वानांनी चावा घेतल्याने मायणीत घबराट निर्माण झाली आहे.
आज रविवार मायणीचा आठवडी बाजारचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पाच दहा मिनिटाच्या अंतरात सदर पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला आहे.मायणी येथील एकूण पाच जणांना मोठ्या प्रमाणात सदर पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला असून त्यांना मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून श्वान दंशावरील लस घेण्यासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र मायणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख यांनी पत्रकारांना दिली . सातारला सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आलेल्या व्यक्ती पुढील प्रमाणे -सचिन रमेश देशमुख, लियाकत गोस नदाफ,अर्चना अतुल सुरमुख, नारायण पांडुरंग माने.
अन्य चार श्वान दंश झालेल्या व्यक्तींना मायणीतील प्रा. आ. केंद्रात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी मायणीच्या ग्राम सुरक्षा समितीच्या वतीने सर्वत्र संदेश पाठवून नागरिकांना याची कल्पना देण्यात आली होती.त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने देखील श्वान पकडण्याचा व स्पीकर वरून सूचना देण्याचा प्रयत्न सुरू होता.