मायणी अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सुरेंद्र गुदगे यांची फेरनिवड
व्हाईस चेअरमन पदी नवनाथ फडतरे .

मायणी अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सुरेंद्र गुदगे यांची फेरनिवड
व्हाईस चेअरमन पदी नवनाथ फडतरे .
मायणी — प्रतिनिधी
खटाव तालुक्याच्या आर्थिक विकासाची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या दि मायणी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, लिमिटेड मायणीच्या चेअरमन पदी विद्यमान चेअरमन सुरेंद्र गुदगे यांची पाचव्या वेळी पुन्हा चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान माजी व्हाईस चेअरमन नवनाथ फडतरे यांचेवर पुन्हा एकदा व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मायणी अर्बन बँकेची निवडणूक यापूर्वी बिनविरोध होऊन विद्यमान चेअरमन सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान आज दिमायणी अर्बन को-ऑपरेटी ब्द बँकेच्या मायणी येथील मुख्य कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते .सदर मीटिंगमध्ये सर्वानुमते सुरेंद्र गुदगे यांची चेअरमन म्हणून फेर निवड करण्यात आली तर नवनाथ फडतरे यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली
. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक ,कोरेगाव प्रीती काळे यांनी काम पाहिले.
दरम्यान निवडीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नवनिर्वाचित चेअरमन सुरेंद्र गुदगे म्हणाले, या बँकेची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्व मतदारांनी खंबीर भूमिका घेऊन ही निवडणूक प्रक्रिया टाळली .गत निवडणुकी वेळी आम्हा गुदगे बंधूंमध्ये झालेल्या मतभेदामुळे काही कार्यकर्त्यांना भावनेपोटी वेगळी भूमिका घ्यावी लागली होती .त्यामुळे स्व. भाऊसाहेब गुदगे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद दिसत होते. मात्र या निवडणुकीत सदर सर्व मतभेद मिटलेले दिसत असून ही संघटना एकजिनसी झाली आहे हेच नवनाथ फडतरे यांच्या निवडीने सिद्ध झाले आहे. नूतन 17 संचालकांमध्ये पाच जुन्या संचालकांना तर 12 नवीन संचालकांना संधी देण्यात आली आहे. आगामी पाच वर्षाच्या कालावधीत काही ज्येष्ठ संचालकांना सन्मानपूर्वक पदाधिकाऱ्याची संधी दिली जाईल. बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांनी आपल्या कामकाजातून ही बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करून त्यातून आपली भविष्यातील पदाधिकाऱ्याची जागा निश्चित करावी.
दरम्यान नूतन व्हाईस चेअरमन नवनाथ फडतरे म्हणाले, विद्यमान चेअरमन सुरेंद्र गुदगे यांनी 2001 सालापासून बँकेच्या चेअरमन पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली गेल्या वीस बावीस वर्षात अनेक बँकांचे राष्ट्रीय बँकांमध्ये विलीनीकरण झाले मात्र अशा सर्व परिस्थितीत मायणी अर्बन बँक सातत्याने अ वर्गात राहिल्याने आज अखेर मायणी अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे हे त्यांच्या कार्य कौशल्याचे प्रतीक आहे . सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक बँकेच्या प्रगतीसाठी निश्चित प्रमाणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. गत वेळी झालेल्या चुका पोटात घालून सुरेंद्र गुदगे यांनी आपणास व्हाईस चेअरमन पदाची पुन्हा संधी दिली हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी सुरेंद्र गुदगे यांचा ज्येष्ठ संचालक शंकर फडतरे यांच्या हस्ते तसेच व्हाईस चेअरमन नवनाथ फडतरे यांचा ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले ते, सुदर्शन मिठारे, भाऊसाहेब लादे ,सर्व बँकेचे नवनिर्वाचित संचालक ,बँकेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.