वेद – प्रयास दिपस्तंभ ‘ पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान.

वेद – प्रयास दिपस्तंभ ‘ पुरस्काराने पत्रकारांचा सन्मान.
वडुज— प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील पत्रकार नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात शिवाय ज्या सामाजिक संस्था अशी कामे करतात त्यांच्या कार्याची दखल घेतात सर्व म्हणून
वेद – प्रयास ‘ पुरस्काराने पत्रकारांना गौरविण्यात आले
जयश्री डायग्नोस्टिक सेंटर , वडूज चे संचालक व पक्षीतज्ज्ञ डॉ.प्रवीण चव्हाण यांनी सदर कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्विकारून खटाव तालुक्यातील सर्व प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया संपादक व पत्रकार यांचा राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान केला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी’ दर्पण ‘ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून ,सर्वसामान्य जनतेचा आवाज खऱ्या अर्थाने शासन व सामाजिक पातळीवर पोहोचवला. हिच परंपरा आजचे पत्रकार पण अतिशय निष्ठेने पार पाडत आहे.याची जाणीव ठेवून,प्रयास सामाजिक विकास संस्थाचे संस्थापक डॉ. कुंडली क मांडवे, डॉ. प्रविण चव्हाण,संतोष चव्हाण सर,आलोक महाजन,अंबिका पूजा भंडार चे संचालक व ज्योतिष तज्ञ आश्विन बोटे, वेद सामाजिक संस्थेचे चित्तरंजन खटावकर शास्त्री, प्रा .नागनाथ स्वामी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रकारांचा उचित सन्मान घडवून आणला.
या वेळी संपादक धनंजय क्षीरसागर, डॉ.विनोद खाडे, विजय जगदाळे,राजीव पिसाळ, धनंजय चिंचकर,शरद कदम, शेखर जाधव,विक्रम काळे,लालासाहेब माने, जे. के.काळे, सौ.मिलिंदा पवार,दत्तात्रय फाळके, कु.रविना यादव,मुन्ना मुल्ला,दत्तात्रय इनामदार, आय्याज मुल्ला,विठ्ठल नलवडे, संतोष साळुंखे, महेश यादव,आकाश यादव, नितीन राऊत,सचिन पवार,महेश तांबवेकर,अकबर भालदार,नितीन घोरपडे,संदीप कुदळे,पंकज कदम,समीर तांबोळी , महेश गिजरे,प्रा.अजय शेटे,फोटोग्राफर अमर फडतरे यांचा विशेष सन्मान सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देवून केला गेला.
पत्रकार हे केवळ वृत्तपत्र चालवत नसून,ते जनतेचे मित्र असतात.असंगाशी संग न करता समाजाशी सत्संग करतात.केवळ दैनिक न कथन करता सैनिक बनतात,एक वैचारिक शस्त्र आणि अस्त्र चालवतात, प्रसंगी ‘सोडू चोरांची लंगोटी आणि नाठाळाच्या माथी हाणू काठी ‘ या न्यायाने आपल्या लेखणीचा प्रहार करतात.आणि ‘सत्याचा विजय असो ‘ हि बिरुदावली सार्थ ठरवतात.त्यामुळे ते समाजाचे ‘ दिपस्तंभ ‘ ठरतात .त्यांचा यथोचित गौरव होणे क्रमप्राप्त आहे.असे सर्व प्रायोजक व मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलून दाखवले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबुराव थोरात साहेब,संतोष देशमाने,सिद्धनाथ गोडसे,दशरथ क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केले.