लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित जिजाऊ पुरस्कार संपन्न
आई-वडिलांना मुलांच्या हस्ते पुरस्कार वितरण

लावण्यस्विहा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित जिजाऊ पुरस्कार संपन्न
आई-वडिलांना मुलांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पुणे (लोणी काळभोर) —लोकप्रवाह वृत्तसेवा
पुणे येथील लोणी काळभोर या ठिकाणी लावणस्विहा बहुउद्देशीय सामाजिक पुणे व टायनी हर्ट्स प्री स्कूल यांच्यावतीने जिजाऊ पुरस्कार घेण्यात आले या पुरस्काराचे मानकरी ठरलेले सर्व महिलांचे संस्थापिका अध्यक्ष प्रियांका अनुप ढम यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या पुरस्काराला वेगळेपण म्हणजेच आई-वडिलांना मुलांच्या हस्ते पुरस्कार यामुळे संपूर्ण परिसर भाऊक होऊन गेला होता.प्रियांका ढम यांनी सांगितले कीआमच्या संस्थेमार्फत देण्यात येणारे पुरस्कार ज्या महिलासमाजात खंबीरपणे उभे आहेत काम करत आहेतव आपल्या कुटुंबाचा निर्वाह करत आहेतसामाजिक कला क्रीडा राजकीयअशा विविध स्तरातील महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम आमची संस्था करत आहे व करत राहील .
जिजाऊ पुरस्कार प्राप्त महिला पुढीलप्रमाणे
माधुरी शिंदे , शिल्पा पवार , अनिता कांगोकर , लता सिन्नरकर , सूमती नलावडे , लीला सोनावणे , जयश्री लोहार , हेमलता ढम , विजया काटे , तृप्ती झोळ , मंगल काळे , आशा काळभोर , मैना वलठे , नंदा भोसले , आरती केदारी, सुरेखा जोशी , अमृता लोणकर , नंदा जाधव , शुंभागी कोरडे ,वैशाली गोगावले , उज्ज्वला चव्हाण , संगिता काळभोर , सर्व पुरस्कार्थीचे सर्वांनी अभिनंदन केले . संस्थेचे पदाधिकारी संध्या नारायणकर , मिलिंदा पवार , अक्षय वलठे , तृप्ती पिसाळ , मिलिंद लोहार या सर्वाच्या व्यवस्थापना मुळे कार्यक्रम उत्कृष्ठ पणे पार पडला