तहसिलदारांची बदली रद्द करण्यासाठी धरणे आंदोलन

तहसिलदारांची बदली रद्द करण्यासाठी धरणे आंदोलन
वडूज – प्रतिनिधी
खटावचे तहसिलदार किरण जमदाडे यांची अन्यायकारक बदली तातडीने रद्द करावी या मागणीसाठी वडूज येथे सर्वपक्षीय कार्यकत्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष सत्यवान कमाने, आर.पी.आय. चे माजी तालुकध्यक्ष गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.
याबाबत आंदोलन करत्यांनी दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, श्री. जमदाडे यांच्यापूर्वी अनेक वर्षे खटाव तालुक्याला पुर्णवेळ तहसिलदार नव्हते. श्री. जमदाडे हे गेले दोन वर्षे कर्तव्यदक्षपणे कार्यरत आहेत. दैनंदिन प्रशासकीय कामकाज करत असताना त्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती. त्यांचा तीन वर्षाचा कालावधी पुर्ण होण्याअगोदरच त्यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होण्याबरोबरच सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे त्यांची तातडीने बदली रद्द करावी. दरम्यान माजी सभापती संदिप मांडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी, नगरसेवक अभय देशमुख, येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सादिक मुल्ला, संभाजी गोडसे, संभाजीराव इंगळे, ज्ञानेश्वर शिंदे,आनंदा साठे, धनाजी काळे, दत्ता केंगारे, ज्ञानेश्वर इंगवले, जगदीश झेंडे, दिनकर जाधव आदिंसह महिला कार्यकत्यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनकत्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. आंदोलन सुरु करतेवेळी कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या मनमानीचा निषेध केला.