घार्गे साहेबांनी काळाची पावले ओळखून निर्णय घ्यावा.. खा. नितीन पाटील
पळशी येथे प्रभाकर घार्गेसाहेबांचा वाढदिवस शेतकरी मेळावा व एआय तंत्रज्ञान माहिती मेळावा संपन्न

घार्गे साहेबांनी काळाची पावले ओळखून निर्णय घ्यावा.. खा. नितीन पाटील
पळशी येथे प्रभाकर घार्गेसाहेबांचा वाढदिवस शेतकरी मेळावा व एआय तंत्रज्ञान माहिती मेळावा संपन्न
मायणी……
.सद्यस्थितीत योग्य विचारधारा जोपासणारे अजितदादा शिवाय दुसरे नाव नाही. तसेच आपण सर्वजन शाहू, फुले यांचे विचार जोपासणाऱ्या नेत्याचा विचार जोपासनारे आहोत . त्यामुळेच मी सांगतो की सद्यस्थितीत ही विचारधारा जोपासणारे अजितदादा शिवाय दुसरे नाव नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे अशा निर्णय घेणारेच आगामी काळात राजकारणात टिकून राहू शकतात. महाराष्ट्रात आगामी २० ते २५ वर्षे कोणाचे राजकारण चालणार याचा विचार करुन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी काळाची पावले ओळखून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील यांनी केले.
पळशी, ता. खटाव येथे खटाव माण अॅग्रो साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे,
अनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते, राजेश पाटील, राजेंद्र राजपुरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, जितेंद्र पवार, संदीप मांडवे, युबक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सी. एम. पाटील, प्रा. अर्जुनराव खाडे, चंद्रकांत पाटील, सुभाष नरळे, अर्जुनराव बलेकर, युवानेते योगेश फडतरे, सभापती दत्ता पवार, बबनराव कदम, संजय साळुंखे, राहूल पाटील, श्रीराम पाटील, सुनिल फडतरे, प्रा. सदाशिव खाडे, अभय देशमुख, मंगेश फडतरे, अशोक कुदळे, संभाजीराव फडतरे, सुहास पिसाळ, तानाजी मगर, हिंमत माने, महेश घार्गे, इंदिरा घार्गे, प्रिती बार्गे उपस्थित होते.
खा. नितीन पाटील म्हणाले, घार्गे यांनी अडचणीच्या काळात सुरुवात करून यशस्वी उद्योजक म्हणून जिल्ह्यात आपली वेगळी प्रतीमा निर्माण केली आहे,
आ. मनोज घोरपडे म्हणाले, ऊसाबरोबर आले व इतर पिकांना ए. आय. तंत्रज्ञान लाभणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने मनुष्य बळाची अडवण दूर होऊ शकते त्याचबरोबर कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकते.
सत्कार मुर्ती प्रभाकर घार्गे म्हणाले.
दुधाने तोंड भाजल्यामुळे निर्णय काळजीपूर्वक घेतला जाईल. काही झाले तरी तालुक्यातील २५ टक्के जनता आपल्याबरोबर आहे. राजकारणात काम करत असताना अनेकांना संधी दिली. त्यापैकी काही प्रामाणिक राहिले. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवला जाईल. खा. नितीनकाकांनी वडील लक्ष्मणरावतात्या यांच्याप्रमाणे आम्हाला ताकद द्यावी. थोडे अडथळे दूर झाले की निश्चितपणे खासदारांचा सल्ला शिरोधार्ह मानला जाईल,
पूर्ण विचार करून तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन यापेक्षा मोठा कार्यक्रम दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर घेऊ, असे ही त्यांनी मत व्यक्त केले
घार्गे पुढे म्हणाले , सद्य परिस्थितीत शेती मालाला बाजार भाव नाही. त्यामुळे शेती क्षेत्रात बदल करणे, काळाची गरज आहे. ए. आय. तंत्रामुळे ऊस, आले व इतर पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी फायदा होणार आहे.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही कोणतीच राजकीय भूमिका घेतली नाही. त्यांनी लवकरात लवकर राजकीय भूमिका जाहीर करावी व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार) प्रवेशचा निर्णय घ्यावा, अशी खुली ऑफर खासदार नितीन पाटील यांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना जाहीर कार्यक्रमात दिली.