वर्धन ऍग्रोची टनेजसह सभासद साखर वाटपास आज पासून सुरुवात
ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांची दिवाळी गोड करणार:-धैर्यशील कदम

वर्धन ऍग्रोची टनेजसह सभासद साखर वाटपास आज पासून सुरुवात
–ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांची दिवाळी गोड करणार:-धैर्यशील कदम
पुसेसावळी प्रतिनिधी :- समद आत्तार
वर्धन ऍग्रो कारखान्याच्या सातवा गळीत हंगाम 2023 -24 दिमाखात सुरू झाला असून गतसन 2022-23 च्या सहाव्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाच्या प्रमाणात टनेजची साखर सवलतीच्या दराने व सभासदांना मोफत आणि कामगारांना प्रत्येकी पाच किलो मोफत साखर वाटप सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर पासून शनिवार 11 नोव्हेंबर अखेर सकाळी 10 वाजले पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्धन कारखाना कार्यस्थळावर करण्यात येणार आहे.वर्धन ॲग्रोने दिलेला शब्द पाळल्यामुळे सभासद,ऊस उत्पादन शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड होईल असा विश्वास वर्धनचे चेअरमन सातारा जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.
वर्धन ऍग्रो कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी ते बोलत होते कदम पुढे म्हणाले की, गत हंगामात कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलले असून शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेत त्यांच्या खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. कारखाना व्यवस्थापनाने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे गेल्या सात वर्षापासून 8.33% बोनस कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे तर मागील तीन वर्षापासून ऊस उत्पादकांना टनेजची साखर सवलतीच्या दरात देण्यास वर्धन कारखान्याने सुरुवात केली आहे योग्य व्यवस्थापन व काटेकर नियोजनामुळे इतर कारखान्यांच्या तुलनेत कारखाना दोन ते अडीच महिने लवकर सुरू करण्यात आला असून जास्तीत जास्त दिवस कारखाना चालवून कारखान्याकडे नोंद असलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढत आहे प्रत्येक वर्षी कारखाना गाळपात वाढ होत आहे ऊस नोंदीच्या 100% प्रोग्राम नुसार ऊसतोड होत असून सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचे सॅम्पल देऊन ऊस तोडीच्या प्रोग्राम ला सहकार्य करावे सल्फरयुक्त व केमिकल युक्त खांडसरी साखर तसेच रिशमिश प्रीमियम जगारी पावडर मार्केट प्रमाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तरी मानवी शरीराला अपायकारक नसणाऱ्या उत्पादनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी धैर्यशील कदम यांनी केले.
गेल्या सात वर्षात अनेक संकटावर मात करत कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी कारखाना व्यवस्थापन व कारखान्याच्या सर्व घटकांनी प्रयत्न केले आहेत त्यामुळे आम्ही सक्षमपणे ऊस उत्पादक शेतकरी,सभासद,कामगारांच्या पाठीमागे उभे असून चेअरमन धैर्यशील कदम यांनी जाहीर केल्याप्रमाणे टनेजच्या प्रमाणात सवलतीच्या दराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना,सभासदांना मोफत तर कामगारांना 8.33% बोनस व 5 किलो साखर मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे वर्धन च्या सर्व घटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विक्रमशील कदम–
कार्यकारी संचालक वर्धन ऍग्रो.