कमळेश्वर विद्या मंदिर विखळे येथील शाळेत स्नेह मेळावा संपन्न
36 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र.

कमळेश्वर विद्या मंदिर विखळे येथील शाळेत स्नेह मेळावा संपन्न
36 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र.
विखळे -, विशेष प्रतिनिधी
तब्बल 36 वर्षानंतर स्नेह मेळाव्यात भेटलेल्या माजी विद्यार्थी आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटले आणि शाळेतील दिवसाच्या जुन्या आठवणी मध्ये रम माण झाले. कोणी शिक्षक, कोणी प्राध्यापक, कोणी पोलीस ऑफिसर,तर कोणी यशस्वी उद्योजक. मोठे झालेल्या सर्वांसाठीच शाळेचे दिवस हा एक जिव्हाळ्याचा विषय असतो.
येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायणी या संस्थेचे कमळेश्वर विद्यामंदिर विखळे ता. खटाव जिल्हा सातारा या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच अतिशय उत्साहात पार पडला. तब्बल 36 वर्षानंतर स्नेह मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र आले व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येण्याचा संकल्प राजाराम घाडगे,बाबासाहेब कटरे,संपत काटकर, शांताराम घाडगे, मधुकर देशमुख यांच्या माध्यमातून पूर्ण झाला.
स्नेह मेळाव्यात प्रा. अशोक घाडगे, पोलीस अधिकारी बाबासाहेब कटरे,यशस्वी उद्योजक महादेव देशमुख, ईश्वर निकम, मधुकर देशमुख, रवींद्र बाबर; बेस्ट कर्मचारी राजाराम घाडगे, डॉ. राजेंद्र बाबर,शिक्षिका सुनीता देशमुख-थोरात, शारदा देशमुख,जयश्री कुंभार, शालन घाडगे वतसला खैरमोडे,भारती वाघमारे, कल्पना क्षीरसागर,स्मिता खैरमोडे, मालन चव्हाण,शांताराम घाडगे, शंकर जगताप, किशोर जंगम, राजाराम कदम, भाऊसाहेब माने,संपत काटकर या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमात 1987 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी एकत्र जमले व तेथे दहावीच्या बॅचला शिकवणारे शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांचे परिचयसत्र संपन्न झाले. त्यानंतरचा मुख्य कार्यक्रम पंढरपूर-मल्हारपेठ रस्त्यावरील ‘जय महाराष्ट्र हॉटेल’च्या छोटेखानी हॉलमध्ये संपन्न झाला.दीप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जे शिक्षक व विद्यार्थी स्वर्गवासी झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. अशोक घाडगे यांनी केले. माजी मुख्याध्यापक मिरासदार सर,भंडारे सर, दिवटे सर, डी.बी. देशमुख सर,महामुनी सर,प्रा. डॉ. माने मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली.
त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संपत काटकर यांनी आपल्या मनोगतात, सर्व वर्ग-मित्रांनी एकमेकांना मदत करण्याचे आणि शाळेच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन केले. ईश्वर निकम, मधुकर देशमुख,भारतीय वाघमारे यांनी शिक्षक आणि शाळेप्रती असलेला आदर आणि त्यांच्या जीवनातील जडणघडणीत शिक्षकांनी केलेले संस्कार, शिस्त मनोगताद्वारे व्यक्त केली. सुनिता देशमुख-थोरात यांनी आयोजित शिक्षकवृंद आणि सर्व वर्गमित्र-मैत्रिणींचे आभार व्यक्त केले.