मायणीच्या जगदंब सांस्कृतिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

मायणीच्या जगदंब सांस्कृतिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मायणी -, प्रतिनिधी
मायणी ता. खटाव येथील जगदंब सांस्कृतिक दुर्गोत्सव मंडळ ,खंडोबा माळ यांच्यावतीने गुरुवार दि. ३ ते सोमवार दि. १४ अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीतील आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि. ३ सायंकाळी ४ वाजता श्री दुर्गामाता देवीची भव्य मिरवणूक व प्रतिष्ठापना .शुक्रवार दि. ४ लहान मुलांच्या रंग भरण व फनी गेम्स स्पर्धा. शनिवार दि. ५ महिला सशक्तिकरण कार्यशाळा सायंकाळी ८ ते १०. रविवार दि. ६ रात्री ८ ते १० होम मिनिस्टर. सोमवार दि. ७ रात्री ८ ते १० भव्य दांडिया स्पर्धा. मंगळवार दि. ८ देवीचा गोंधळ व दांडिया. बुधवार दि. ९पाक कला स्पर्धा व दांडिया. गुरुवार दि. १० कुमकुम विधी व महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम. शुक्रवार दि. ११ महाराष्ट्राची लोकधारा हिंदी मराठी गीतांचा नृत्याविष्कार. सायंकाळी ६ ते ११ शनिवार दि. १२ झी टॉकीज फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार ह भ प शिवलीलाताई पाटील यांचे सायंकाळी ५ ते ९ कीर्तन. रविवार दि. १३ श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद .सोमवार दि. १४ देवीचा विसर्जन सोहळा. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन जगदंब सांस्कृतिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.