जनतेला दिलेला शब्द पाळला— सुरेंद्र गुदगे

जनतेला दिलेला शब्द पाळला— सुरेंद्र गुदगे
भिसेवस्ती ते अप्रोचरोड मुरुमीकरण खडीकरण शुभारंभ
मायणी –प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी मागितलेल्या विकास कामांची पूर्तता करून जनतेस आपण दिलेला शब्द पाळला. गेल्या पाच वर्षात मायणी ग्रामपंचायतीची सत्ता आपणाकडे नसल्यामुळे अनेक विकास कामे थटून राहिली. विकासाला साथ देणाऱ्या व पारदर्शी कारभाराला लोकांनी मते दिली त्यामुळे लोकांनी सत्ता पुन्हा आपल्या गटाकडे दिली. गेल्या पाच वर्षात खोळंबलेल्या विकास कामांना गतिमान करण्याचा आपण प्रयत्न करू तसेच सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत सत्तेचा लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
मायणी ता. खटाव येथील ग्रामपंचायत निधीतून रुपये रुपये दहा लाख खर्चाच्या अभयारण्यातील भिसे रोड ते अप्रोच रोड मुरमीकरण व खडीकरण, तसेच लाईटच्या कामाचा शुभारंभ करताना आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदर वेळी उपसरपंच दादासाहेब कचरे, ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनिता बागडे, युवराज भिसे, संदीप माळी, किशोर माळी, समीर नदाफ, माती ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी महेश जाधव, सुरेश पवार ,विनोद पवार, खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल माळी ,अर्बन बँकेचे संचालक अन्सर इनामदार ,अविनाश दगडे, बाजार समितीचे संचालक स्वप्निल घाडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे, तानाजी सोमदे, सोसायटीचे सदस्य सुभाष भिसे, डॉ. विकास देशमुख, शिवाजी देशमुख, अरुण भिसे, रामभाऊ सोमदे ,अरुण चोथे ,डॉ.अमोल चोथे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरेंद्र गुदगे पुढे म्हणाले, या भागातील रस्त्याचे कामाचे अनेक वर्षांची मागणी होती. प्रारंभी रुपये दहा लाख खर्चातून मुरमीकरण व खडीकरण करण्यात येईल व उर्वरित 25 लाख रुपयातून डांबरीकरण करण्यात येईल. या पुढील काळात यशवंत नगर मधील स्वामी समर्थ रस्ता, शिंदेवाडी ज्योतिबा मंदिर सभा मंडप रुपये सात लाख, माळीनगर सिमेंट रस्ता रुपये वीस लाख, आदी विविध विकास कामांचे प्रस्ताव मंजूर झाले असून तातडीने सदर कामास प्रारंभ करण्यात येईल.