श्री श्री विद्यालयात शतकोत्तर रोप्य महोत्सव साजरा

श्री श्री विद्यालयात शतकोत्तर रोप्य महोत्सव साजरा
औंध -महेश यादव
औंध येथील श्री ,श्री, विद्यालयात शतकोत्तर रोप्य महोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला या विद्यालयाने नामवंत साहित्यिक , यशस्वी कलाकार ,ज्येष्ठ विचारवंत ,दिगग्ज व्यावसायिक, घडवले यात आप्पासाहेब पंत, साने गुरुजी, ग .दि. माडगूळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉक्टर. शंकरराव खरात, डॉक्टर के . ना .वाटवे, माधवराव सातवळेकर, मधुकर पाठक, माधव कुलकर्णी असा महान व्यक्तिमत्वाची आठवण करून देणारा हा दिवस
शतकोत्तर महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम तसेच उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने येमाई मंदिर साफसफाई , औंध एसटी स्टँड परिसरात वृक्षारोपण, गरजू लोकांसाठी अन्नछत्र, कोरोना काळातील लोकांना घरगुती किट वाटप, कोरोना काळात पेशंटला केलेली मदत, या निमित्ताने श्री श्री विद्यालयाचा परिसरात रंगरंगोटी ,परिसर स्वच्छता करण्यात आली विद्यालयातील हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला यात सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला