जयराम स्वामी वडगाव येथे मराठा आरक्षण मिळविण्यासाठी कॅण्डल मार्च.

जयराम स्वामी वडगाव येथे मराठा आरक्षण मिळविण्यासाठी कॅण्डल मार्च
प्रतिनिधी :- समद आत्तार
खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथे मराठा समाजाला आरक्ष मिळावे या मागणीसाठी व मनोज जरांग पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॅण्डल मार्च काढण्यात आले.याप्रसंगी चिमुकल्यांसह महिला, युवक व अबालवृद्धांनी हातात कॅण्डल घेऊन गावातून फेरी काढली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा दिलेल्या घोषणांनी
परिसर दुमदुमून गेला. फेरीनंतर आरक्षणाबाबत भाषणे झाली.
सायंकाळी सातच्या सुमाराचिमुकलीमुलं,महिला,तरुण व अबालवृद्ध एकत्रित आले. त्यानंतर मशाल पेटवण्यात आली व गावातून कॅण्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. फेरीच्या पुढे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे – पाटील यांना एकमुखी पाठिंबा असलेला फलक घेऊन सहभागी झाले होते… त्यामागे गावातील सर्व पक्षीय ग्रामस्थ सहभागी झाले होते. ही फेरी आरक्षणाच्या घोषणा देत गावातून फिरवण्यात आली.
फेरी माघारी आल्यानंतर युवक व ग्रामस्थांची भाषणे झाली. तसेच गावात कोणत्याही सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.