स्त्री मनाचा ठाव घेत मानवी मनाला जागृत करणाऱ्या कवयित्री — सौ विद्या रमेश जाधव ( विरजा )

स्त्री मनाचा ठाव घेत मानवी मनाला जागृत करणाऱ्या कवयित्री — सौ विद्या रमेश जाधव ( विरजा )
लोकप्रवाह — महेश तांबवेकर
सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराच्या मानकरी विद्या रमेश जाधव या प्राथमिक शिक्षक असून त्या विरजा या टोपण नावाने लेखन करतात त्यांचा स्त्री मनाचा ठाव घेणाऱ्या कवितांचा “कोंदण ” व “लेवाट” कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे
कवयत्री विरजा कविता करताना स्त्री मनाला केंद्रस्थानी ठेवून काव्यरचना करत असून त्यांच्या कविता थेट मानवी मनाला जागृत करणाऱ्या व जगण्यासाठी उमेद देणाऱ्या अशा आहेत त्यांनी अनेक कविता संमेलनातून तसेच कार्यशाळेतून निवोदित साहित्यकरांना मार्गदर्शन करून त्यांना नव साहित्य निर्मितीची प्रेरणा देत आहेत
शिक्षकी पेशाला न्याय देत असताना त्यांनी शालाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे अशा हरहुन्नरी बहु आयामी शिक्षकेला अर्थात कवयत्रिला अनेक पुरस्कार तसेच काही पदे भुषवण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे अशा कवयित्री मनाच्या शिक्षिकेचा सर्व स्तरातून सन्मान व कौतून होत आहे
पुरस्कार
#सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार
#सहित्य केसरी तर्फे पीपल चॉईस अवार्ड पुरस्कार
#न्यायिक लढा पत्रकार संस्थेमार्फत साहित्य क्षेत्रातील पुरस्कार
#अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या बारामती शहर उपाध्यक्षपदी निवड
काव्यसंग्रह
कोंदण व लेवाट