विश्वात्मा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गरिबांसाठी वरदान ठरणार –आबासाहेब देशमुख

विश्वात्मा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गरिबांसाठी वरदान ठरणार –आबासाहेब देशमुख
मायणी प्रतिनिधी
मायणी येथे नव्याने सुरू करण्यात आलेले विश्वात्मा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे गरिबांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आबासाहेब देशमुख यांनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी केले
ते पुढे म्हणाले हे हॉस्पिटल आधुनिक सुविधांनी सज्ज असून गरजू रुग्णांची वेळ व पैसा बचत करणारी अशी ही सुविधा आहे येथे काम करणारे तज्ञ डॉक्टर हे सामाजिक बांधिलकी मानून काम करण्यासाठी एकत्र आले असून या हॉस्पिटलची उभारणी अल्पावधीत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे हे हॉस्पिटल अल्पावधीतच नावारूपाला येईल यात कोणतीही शंका नाही व अत्याधुनिक सुविधांमुळे व तज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास ही मदत होईल . ग्रामीण भागात अशा प्रकारे तज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक सुविधांनी सज्ज हॉस्पिटलची निर्मिती केली त्या बद्दल सर्व टीमला धन्यवाद देतो
यावेळी विश्वात्मा सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर सयाजी पवार डॉक्टर मानाजी कदम मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दत्तात्रय तांबवेकर खजिनदार डॉ महेश साळुंखे तसेच सर्व सदस्य व मायणी ,विटा, तासगाव, सांगली ,मिरज परिसरातील तज्ञ डॉक्टर तसेच मायणीच्या सरपंच सौ सोनाली रंणजीत माने व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
या उद्घाटन प्रसंगी विश्वास त्याचे अध्यक्ष डॉक्टर सयाजी पवार म्हणाले या पुढील काळात रुग्णांना योग्य वेळेत आधुनिक सुविधांसह उपचार मिळण्याची प्रक्रिया झालीअसून अतिशय जलद गतीने येथे उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हे हॉस्पिटल उपयुक्त ठरणार आहे येथे 24 तास तज्ञ डॉक्टर सेवेसाठी उपलब्ध असून येथे काम करणारे सर्व डॉक्टर हे सामाजिक सेवेच्या बांधिलकीतून एकत्रित येऊन ग्रामीण भागातील जनतेला रुग्णांना योग्य वेळेत आधुनिक व योग्य उपचार करून त्यांच्या वेळेची पैशांची बचत करण्याच्या दृष्टीने एकत्र येऊन या विश्वात्मा हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे लवकरच हे आपल्या कार्यामुळे नावारूपाला येईल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना या आधुनिक सुविधांनी सज्ज हॉस्पिटलची उभारणीसाठी एकत्र आल्याबद्दल धन्यवाद देतो
याप्रसंगी संजय साळुंखे डॉक्टर मानाजी कदम यांची भाषणे झाली तसेच डॉ अभिजीत डॉक्टर डॉ अभिजीत मोरे डॉक्टर डॉ अविनाश लोखंडे डॉ शंकर माने डॉ मकरंद तोरो डॉ उस्मान सय्यद डॉ प्रवीण तोरणे डॉ निरंजन गरवारे डॉ विकास कदम डॉ अमोल चोथे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉक्टर अमोल चोथे यांनी मानले