आपला जिल्हा
औंध मध्ये आज विकास कामांचा उद्घाटन सोहळा

औंध मध्ये आज विकास कामांचा उद्घाटन सोहळा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर कामांची उद्घाटन करण्यात आले.
औंध -प्रतिनिधी
श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली औंधचे प्रथम नागरिक सौ सोनाली शैलेश मिठारे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने मंजुरी कामाचे स्वरूप पुढील प्रमाणे
1)डॉक्टर साळुंखे हॉस्पिटल ते खबालवाडी रस्त्या तसेच चिंतामणी घर ते दर्गा रस्ता
2) औंधेश्वर मंदिर ते कुंभार टेक रस्ता
3) ज्ञानेश्वर यादव ते पटवेकरी चे घर काँक्रीट रस्ताआणि गटर मंजुरी
4) बादशाह मध्ये घर ते कुंभार टेक ते आयटीआय रस्ता व गटार मंजूर
5) अण्णाभाऊ साठे नगर ते गोटे वस्ती गट मंजूर
6) मागासवर्गीय पाणीपुरवठा योजना निधी मंजूर
7) देशमुख आड ते विकास अभंग घर डांबरी रस्ता मंजूर
अशा विविध उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे श्री हनमंतराव शिंदे यांनी केले. यावेळी औंध गावचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.