डिजीटल मिडीया संपादक, पत्रकार संघ खटाव कार्यकारिणीची निवड
सन 2024-25 साठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

डिजीटल मिडीया संपादक, पत्रकार संघ खटाव कार्यकारिणीची निवड
सन 2024-25 साठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
वडुज – विशेष प्रतिनिधी
खटाव तालुका डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघाची बैठक महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडीया अध्यक्ष मा.राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात सन 2025 च्या नवीन कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. बदलत्या काळा नुसार गतिमान जगात बातमी सुद्धा गतिमान करण्याचं काम डिजिटल मीडिया करते .त्यामुळे आता या प्रणालीचे महत्त्व वाढू लागले आहे. ‘वेळ आणि वेग’ याचा विचार करता व्हिडिओ तसेच ब्लॉग न्यूज नेटवर्क महत्त्व हे आजच्या वेगवान काळात अधोरेखित झाले आहे.अचूकता,आकर्षकता,सत्यता, सडेतोडपणा,’ सुंदराचे कौतुक व असुंदरावर प्रहार,’ ‘नाही रे ‘पेक्षा ‘ आहे रे ‘ वाल्यांच्या कामाचे केलेले कौतुक,प्रत्यक्ष दिखावूपणा पेक्षा टिकावू पणाचा केलेला जयजयकार, पापभिरू वृत्ती, व्यावसायिकते पेक्षा सत्याची धरलेली कास ही समाजाला भावली आहे त्यामुळेच वाचकांच्या हृदयात डिजीटल मिडियाचे वेगळेच स्थान आहे. हिच तिची अत्याधुनिक ताकद अधिक सुनियोजित पद्धतीने प्रकट करून, समाजा समोर ‘आधी केले – मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे तिचे सादरीकरण अधिक उत्तम करण्यासाठी व समाज मनाचा आरसा बनण्याचे काम ही नूतन कार्यकारिणी करणार आहे.
जनतेच्या सुख – दुःखात सम न्यायाने सामील होऊन,व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी जाहिरात या पासस्टाव्या कलेच्या माध्यमातून माफक किमतीत आधारभूत ठरणारी ,नोकरदारांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडणारी,अन्यायाच्या विरोधात पोटतिडकीने लढून न्याय मिळवून देणारी, मदमत्त हत्तीवर अंकुंश ठेवणारी, शोषकांच्या पेक्षा शोषितांच्या पाठीशीकोण भक्कमपणे उभी राहणारी,वादात तडजोड घडवून आणणारी, ग्राहक सेवांचा लाभ मिळवून देणारी,सर्वांना बरोबर घेवून वाटचाल करणारी व प्रत्यक्ष सेवा मूल्यावर भर देण्याची ग्वाही यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी यावेळी दिली.
नव नियुक्त कार्यकारणी पुढील प्रमाणे
१) तालुका अध्यक्ष ……..डॉ.विनोद खाडे
२) कार्याध्यक्ष-…….विजय जगदाळे
३) उपाध्यक्ष-…….राजीव पिसाळ
४) संघटक- …….अजय शेटे
५) सचिव -……जालिंदर काळे
६) सहसचिव-….सौं. मिलिंदा पवार
७) खजिनदार-….महेश यादव
८) सहखजिनदार-….दत्तात्रय फाळके
९) प्रसिद्धी प्रमुख- …लालासाहेब माने- पाटील
१०) संपर्कप्रमुख – सचिन पवार
११) मार्गदर्शक- …महेश तांबवेकर
12) अकबर भालदार – सदस्य
13) नितीन घोरपडे – सदस्य
14) पंकज कदम – सदस्य
15) संदीप कुदळे -सदस्य
यावेळी श्री.विजय जगदाळे,श्री.राजीव पिसाळ यांचीही मनोगते झाली.ते म्हणाले की,यात काम करणाऱ्या पत्रकार व संपादक वर्गाच्या काही समस्या व अडचणी पण असून, त्या शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून मांडून त्या द्वारे प्रामाणिकपणे न्याय मिळविण्याचा प्रयत्न लवकरच केला जाणार आहे.
या वेळी महिला पत्रकार प्रतिनिधी सौ. मिलींदा पवार यांचेही मनोगत झाले.त्या म्हणाल्या की,पत्रकारिता क्षेत्रात महिलांची संख्या अतिशय कमी आहे. पण ‘ आवड आणि योग्य निवड असेल तर सवड ‘ काढून काम करणाऱ्या अनेक महिलांना या क्षेत्रात आपण आणणार असून,त्या द्वारे महिलांच्या प्रश्नांना एक नवे व्यासपीठ मिळवून देवून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.या निवडी बाबत सर्वांचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिराळे सह सर्व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले.