कु .आदिती वास्केचे निबंध स्पर्धेत यश.

कु .आदिती वास्केचे निबंध स्पर्धेत यश.
मायणी — प्रतिनिधी
कोरेगाव तालुकास्तरीय जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये डॉ.वा.गो. परांजपे विद्यालय, रहिमतपूर या विद्यालयात इ.१० वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी . कु. आदिती अरुण वास्के हिने इ.९ वी ते १२वी मोठ्या गटामध्ये निबंध स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
सदर विज्ञान प्रदर्शन मुधाई विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज, देऊर ता. कोरेगाव येथे आयोजित करण्यात आले होते. कार्बन उत्सर्जन एक जागतिक समस्या या विषयावर तिने निबंध लिहिला होता. त्याबद्दल तिचा तेजस शिंदे, चोपडे ,राजेश कदम ,इंगवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा या उज्वल याच्याबद्दल तिचे विद्यालयाचे मुख्याध्यापक वावरे सर, विज्ञान शिक्षक बडीगार सर व शाळेतील शिक्षक .ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश सुरमुख यांची ती नात आहे