गुणागोविंदाने नांदण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनीच हात पुढे करा– बापू बांगर अतिरिक्त पोलीस अधीक्षक
पुसेसावळी येथे झाली जाती सलोखा मिटिंग

गुणागोविंदाने नांदण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनीच हात पुढे करा– बापू बांगर अतिरिक्त पोलीस अधीक्षक
प्रतिनिधी :- समद आत्तार ..
देशातील विविध जाती ही आपली कमजोरी नसून हीच खरी ताकद आहे. मात्र हीच आपली ताकद तोडण्याचा काहीजण प्रयत्न करत असून जाती धर्मातील एकोप्याला आणखीन बळकटी देत पुढे जात राहू. समाजातील विघ्न आणणाऱ्यांचा पायबंद घालण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी.
आपला व आपल्या गावातील लोकांचा दुरुपयोग होऊन देऊ नका. भविष्यात चांगल्या कामासाठी उभं राहायचं आहे. व वाईट कामाचा विरोध करा. पुसेसावळीत झालेल्या अपघात चुकीची घटना विसरून सर्वांनी गुणागोविंदाने नांदण्यासाठी पुन्हा एकदा हात पुढे करा. असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी केले.
या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर,सहा. पोलीसनिरीक्षक डी. एस.वाळवेकर,पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, पो. ना.सरतापे, पो. ना. वाघ,सरपंच सौ.सुरेखा माळवे, दत्तात्रय रुद्रके,सौ. भाग्यश्री भाग्यवंत,सुरेशबापू पाटील,संतोष घार्गे, सुहास पिसाळ,उदय गुरव सर्व पोलीस पाटील,जेष्ठ नागरिक, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.